Japan Tsunami : भूकंपाच्या धक्क्यांनी जपान हादरले आहे. नवीन वर्षाचा पहिल्याच दिवशी झालेल्या या भूकंपाच्या धक्यामुळे नागरीक दहशतीत आहेत. या भूकंपामुळे समुद्रात त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
(1 / 5)
उत्तर मध्य जपानमध्ये सोमवारी तब्बल २१ भूकंपाच्या धक्यांनी हादरले. तब्बल ९० मिनिटे हे धक्के जाणवले. त्यापैकी एका भूकंपाची तीव्रता ही ७.६ तीव्रता नोंदवली गेली. (AFP)
(2 / 5)
जपानमधील इशिकावा, नायगाता, तोयामा आणि नोटो राज्ये भूकंपाने हादरली. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. खांब तुटले आहेत. झाडे कोसळली आहेत.(via REUTERS)
(3 / 5)
भूकंपांच्या मालिकेनंतर, हवामान खात्याने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. काही वेळातच १.२ मीटर उंच लाटा वाजिमा शहराला धडकल्या. ५ मीटर उंच लाटा इशिकावा येथील नाटो किनारी भागात आदळल्याचे दिसते.(AP)
(4 / 5)
जपानमधील त्सुनामी आणि भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अलर्ट जारी केला आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्सुनामीचा धोका असलेल्या भागातील लोकांना सुरक्षित आणि उंच ठिकाणी हलवण्यात येत आहे.(AP)
(5 / 5)
जपानमधील भूकंप आणि त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. धोक्यात असलेल्या भागातील भारतीयांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आला आहे.(AP)