हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, असे मानले जाते. यंदा देशभरात ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवचा उत्सव सुरू होणार आहे आणि गणेश विसर्जन १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवात लोक बाप्पाच्या स्वागतासाठी घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढतात.
गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्तांनी घरोघरी जय्यत तयारी सुरू केली आहे. ज्याची सुरुवात घराच्या अंगणात काढलेल्या रांगोळीने होईल. रांगोळी हे शुभाचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यासाठी रांगोळी नक्कीच काढली जाते.
बाप्पाच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढून गणपतीचे आनंदाने आणि उत्साहात स्वागत करता येते.
घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी तुम्ही या सुंदर रांगोळीने तुमचे घर सजवू शकता. गणेश चतुर्थीला घराच्या अंगणात काढलेली ही रांगोळी अतिशय सुंदर आणि यूनिक आहे.
जर तुम्ही रांगोळी काढण्यात चांगले नसाल तर ही साधी रांगोळी डिझाईन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ही रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला झेंडूची फुले आणि आंबा किंवा विड्याची पाने लागतील.
( instagram)रांगोळी काढताना योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे. वारा नसलेल्या ठिकाणी रंगांनी बनवलेली रांगोळी काढा, नाहीतर वाऱ्यामुळे रांगोळीचे रंग खराब होऊ शकतात. रांगोळीची ही डिझाइन दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती बनवायलाही सोपी आहे. यामध्ये विविध रंगांनी गणपती बाप्पाची मूर्ती बनवून त्यात रंग भरा.
जर तुम्ही विशिष्ट प्रकारची रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर ही डिझाइन तुमच्यासाठी परफेक्ट आहे.