Lip Care Tips: हिवाळ्यात ओठ फाटले? आराम देईल हे घरगुती स्क्रब-try these homemade scrubs to get rid of dry lips in winter ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Lip Care Tips: हिवाळ्यात ओठ फाटले? आराम देईल हे घरगुती स्क्रब

Lip Care Tips: हिवाळ्यात ओठ फाटले? आराम देईल हे घरगुती स्क्रब

Jan 08, 2024 06:11 PM IST
  • twitter
  • twitter
  • Homemade Scrub for Lips: हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या अनेकांना भेडसावते. जर तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल आणि गुलाबी ओठ मिळवायचे असतील तर हे घरगुती स्क्रब वापरा.
हिवाळ्यात बहुतांश लोकांचे ओठ फाटतात. क्रीम लावणे, लिप बाम लावणे याने अनेकदा समस्या सुटत नाही. अशावेळी लिप स्क्रब खूप उपयुक्त ठरू शकते. हे ओठांवरच्या मृत पेशी काढून टाकेल आणि त्यांना पुन्हा गुलाबी करेल. पण दुकानातून विकत घेतलेले लिप स्क्रब नाही तर हे घरीच बनवा. 
share
(1 / 7)

शुगर स्क्रब: एक चमचा साखर मध किंवा खोबरेल तेलात चांगले मिक्स करा. ते ओठांवर चांगले चोळा. २-३ मिनिटांनी ओठ चांगले धुवा. हे ओठांच्या मृत पेशी काढून टाकेल आणि त्यांना मऊ ठेवेल.
share
(2 / 7)

गुलाबाच्या पाकळ्या: गुलाबाच्या काही पाकळ्या दुधात भिजवून मॅश करा. नंतर ते ओठांवर लावा आणि थोड्या वेळाने धुवा.
share
(3 / 7)

कॉफी स्क्रब: कॉफी एक उत्तम स्क्रबर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. एक चमचा कॉफी पावडर घ्या आणि त्यात मध आणि ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि ओठांना चोळा. नंतर कोमट पाण्याने ओठ धुवा. 
share
(4 / 7)

बीटरूट स्क्रब: बीटरूट पावडर एक चमचा मध आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा आणि ओठांवर लावा. नंतर हलके चोळा. थोडावेळ तसेच राहू द्या आणि नंतर धुवा.
share
(5 / 7)

मऊ टूथब्रश: कोमट पाण्यात तुमचा टूथब्रश ओला करा आणि हळूवारपणे ओठ घासून घ्या. हे मृत पेशी काढून टाकेल. ओठांचे ब्लड सर्कुलेशन वाढेल.
share
(6 / 7)

ओठावर जिभ फिरवू नकाः अनेक लोक ओठ कोरडे झाल्यावर त्यावरून जिभ फिरवतात. पण असे करणे योग्य नाही. त्यामुळे ओठ अधिक कोरडे होतात. प्रत्येक वेळी लिप बाम लावा.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज