Home Remedies for Cold and Cough in Monsoon: पावसाळ्यात बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला पावसाळ्यात सतत सर्दी, कफ आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही यापासून सुटका मिळवण्यासाठी हे काही घरगुती उपाय करू शकता.
(1 / 6)
पावसाळ्यात सर्दी-खोकल्याबरोबरच छातीत कफ जमा होण्याची तक्रार अनेकदा लोक करतात. बहुतेक लोक छातीत जमा झालेल्या कफपासून आराम मिळविण्यासाठी अँटीबायोटिक्स घेतात. परंतु कधी कधी अँटीबायोटिक्स देखील कार्य करत नाहीत. यासाठी घरगुती उपचार हे सर्वात प्रभावी औषध आहे. (shutterstock)
(2 / 6)
तुळस आणि आल्याचा चहा प्या. तुळस आणि आल्यातील अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म सर्दी-खोकल्यापासून आराम देतात. छातीत जमा झालेले कफ बाहेर काढण्यासाठी तुळशी आणि आल्याचा चहा पिण्याची सवय लावा. यामुळे कफची समस्या लवकर दूर होईल. (shutterstock)
(3 / 6)
निलगिरीच्या तेलाचे काही थेंब नाक आणि छातीवर लावल्यास छातीत जमा झालेल्या कफपासून आराम मिळतो(shutterstock)
(4 / 6)
छातीत जमा झालेल्या कफपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून वाफ घ्यावी. दिवसातून दोन ते तीन वेळा असे करावे. यामुळे सर्दी, खोकला, कफ लवकर बरा होण्यास मदत होईल. (shutterstock)
(5 / 6)
वाफ घेतल्यानंतर एका बाऊल पाण्यात एक चमचा चहा पावडर घालून चांगले उकळावे. त्यात सैंधव मीठ टाकून त्याने गार्गल करा. असे केल्याने टॉन्सिलची समस्याही दूर होईल. तसेच छातीत जमा झालेला कफ आणि घसादुखीचा त्रासही दूर होईल. (SHUTTERSTOCK)
(6 / 6)
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी गायीच्या तुपात थोडे सैंधव मीठ मिसळून रात्री झोपण्यापूर्वी छातीवर लावा. हा उपाय केल्याने छातीत जमा झालेला कफ विरघळेल. (shutterstock)
(7 / 6)
छातीत जमा झालेल्या कफपासून आराम मिळण्यासाठी तुळस, अमृतवेल, गूळ, काळी मिरी, आल्याचा रस आणि लवंग घालून काढा तयार करावा. सकाळी रिकाम्या पोटी हा काढा प्यायल्याने खोकला आणि कफपासून लवकर आराम मिळतो. (shutterstock)