Remedies for Crack Lip: हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या सामान्य आहे. पण तुम्ही या काही गोष्टी लावल्या तर हिवाळ्यात तुमचे ओठ अजिबात फाटणार नाही.
(1 / 6)
हिवाळा म्हटला की ओठ फाटण्याची समस्या उद्भवते. लिप बाम, क्रीम लावल्यानंतरही अनेकांचे ओठ फाटून त्यातून रक्त येते. काही घरगुती उपाय आहेत जे फाटलेले ओठ बरे करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.(Freepik)
(2 / 6)
तुम्ही तुमच्या ओठांवर बटर लावू शकता. लोणी लावल्याने फाटलेले ओठ बरे होतात. तसेच बटर थोडे गरम करून ओठांना हलक्या हातांनी मसाज करा. यााने तुम्हाला आराम मिळेल.(Freepik)
(3 / 6)
तुम्ही तुमच्या ओठांवर मध लावू शकता. मध फाटलेले ओठ बरे करू शकते. दररोज आंघोळीपूर्वी ओठांना मधाने मसाज करा. साधारण ५ ते १० मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. (Freepik)
(4 / 6)
तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर दूध लावू शकता. दूध त्वचेला हायड्रेट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते.(Freepik)
(5 / 6)
एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल एकत्र करून ओठांवर लावा. ते त्वचा मऊ करते. आणि फाटलेली त्वचा बरी होते. याने ओठांवरील डेड स्किन काढून टाकली जाते.(Freepik)
(6 / 6)
हिवाळ्यात तुम्ही ओठांवर ऑलिव्ह ऑईल लावू शकता. ऑलिव्ह ऑइल फाटलेले ओठ दुरुस्त करते. त्वचेला हायड्रेट ठेवते. यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि त्वचा चांगली राहते.(Freepik)