Home Remedies for Back Pain: सतत बसून काम केल्यामुळे पाठदुखीचा त्रास होत आहे का? जाणून घ्या काही सोप्या टिप्स ज्यामुळे पाठदुखीपासून त्वरित आराम मिळेल.
(1 / 6)
पाठदुखीमुळे ऑफिसमध्ये किंवा घरी अचानक ओरडणारे अनेक जण असतात. पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. या समस्येपासून काही वेळात सुटका करण्याचे काही उपाय पाहूया. (Freepik)
(2 / 6)
पाठदुखी किंवा कंबरदुखी टाळण्यासाठी दररोज थोडा व्यायाम करा. हलक्या व्यायामाने पाठदुखीपासून आराम मिळतो. जर पाठदुखीमुळे तुम्हाला व्यायाम करायला नाही सांगितले असेल तर करु नका किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. (Freepik)
(3 / 6)
एका भांड्यात मोहरीचे तेल, लसूण, काळे जिरे घालून थोडे थंड होऊ द्या. तेल थंड झाल्यावर त्या तेलाने कंबरेला मसाज करा. यामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो.(Freepik)
(4 / 6)
तुम्ही गरम बॅगने शेक घेऊ शकता. कंबरेत तीव्र वेदना होत असल्यास हीटिंग बॅगने शेक दिल्यास आराम मिळेल. हॉट बॅग मसाज करण्यापूर्वी तुम्ही थोडे मोहरीच्या तेलानेही मसाज करू शकता.(Freepik)
(5 / 6)
पाठदुखीपासून आराम मिळण्यासाठी निलगिरीचे तेल वापरा. वेदना कमी करण्यासाठी निलगिरी तेल अत्यंत उपयुक्त असते. याशिवाय सांधेदुखीचा त्रास कमी होण्यासही ते मदत करते.(Freepik)
(6 / 6)
पाठदुखीच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी शरीराच्या वजनावर नक्कीच लक्ष केंद्रित करा. अतिरिक्त वजनामुळे पाठ किंवा पाय दुखणे वाढू शकते. म्हणून शक्य तितके वजन नियंत्रित ठेवा.(Freepik)