उचकी केव्हाही येऊ शकते आणि थोडे पाणी प्यायल्यानंतर लगेच थांबते. काही लोकांमध्ये उचकी स्वतःच थांबत नाही तर हे दीर्घकाळ टिकू शकते. उचकी काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत टिकू शकते आणि जास्त खाल्ल्याने उद्भवू शकते.
जास्त मसालेदार पदार्थ खाणे, अल्कोहोलचे सेवन, सोडा सारख्या कार्बोनेटेड पेये आणि खूप गरम किंवा खूप थंड असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे उचकी येऊ शकते.
उचकीच्या वेळी पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला बरं वाटत नसेल तर थोडा वेळ श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न नक्की करा. हे करण्यासाठी, बसा आणि काही सेकंद आपला श्वास रोखून ठेवा. दहा ते वीस सेकंद थांबा आणि पुन्हा श्वास घ्या. काही काळ असेच चालू ठेवा. थोड्या वेळात तुमची उचकी कमी होईल.
उचकी थांबवण्याची आणखी एक पद्धत आहे. एक ग्लास पाणी प्या. पण नेहमीच्या पद्धतीऐवजी हाताने नाक झाकून पाणी प्यावे. असे केल्यास उचकी लगेच कमी होईल.
आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपली उचकी थांबत नसेल तर लिंबू मदत करू शकते. एक लिंबू चिरून त्यात थोडे मीठ घालून त्याचा वास घ्यावा. काही वेळाने उचकी थांबते. उचकी थांबविण्यासाठी आपण पांढरी साखर देखील वापरू शकता. फक्त एक चमचा साखर खा आणि लवकरच तुमची उचकी थांबेल.
तुम्हाला हवं असेल तर एक ग्लास थंड पाण्यात साखर विरघळवून सरबत म्हणून पिऊ शकता. हे सर्व करून पाहिल्यानंतरही उचकी थांबत नसेल, म्हणजेच सलग दोन दिवस उचकी थांबली नाही तर डॉक्टरांना भेटा.