Home remedies for constipation in Kids: मुलांना अनेक वेळा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. आहारात फायबरचा अभाव, पुरेशा प्रमाणात पोषण न मिळणे असे कितीतरी कारणे असू शकतात. ही समस्या सोडवण्यासाठी या टिप्स पाहा.
(1 / 8)
जंक फूड खाणे, रात्री उशिरापर्यंत जागी राहणे, अनियमित वेळी खाणे यामुळे मुलांमध्ये बद्धकोष्ठता वाढू शकते. आयुर्वेद तज्ज्ञ दीक्षा भावसार यांनी मुलांची ही समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. (Pexels)
(2 / 8)
बाळाला रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी द्या. त्यामुळे हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल.(Pexels)
(3 / 8)
मुलांना रोज सकाळी 4-5 भिजवलेले मनुके खायला द्या. यामुळे पोटही वेळेत साफ होईल.(Pixabay)
(4 / 8)
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गाईच्या दुधात अर्धा चमचा तूप मिक्स करून मुलाला प्यायला द्यावे. त्यामुळे देखील पोट सहज साफ होईल. (Unsplash)
(5 / 8)
मुलाला गॅसची समस्या असेल तर ती कमी करण्यासाठी रात्री झोपताना त्यांच्या पोटावर हिंगाची मालिश करा. मसाज करताना हात सर्कुलर फिरवा. घड्याळाच्या दिशेने मालिश करण्याचे लक्षात ठेवा. (Pinterest)
(6 / 8)
मुलांना कच्च्या भाज्या खाऊ देऊ नका. अर्धवट शिजलेल्या भाज्यांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कच्च्या भाज्या देणे टाळा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होईल. (Pexels)
(7 / 8)
त्यांना घरी शिजवलेले हलके अन्न द्यावे. शिळे अन्न देऊ नका. बाहेरचे जंक फूड किंवा जास्त गोड पदार्थ नको. हे स्टूल कडक करतात.(Unsplash)
(8 / 8)
त्यांना बाहेर मैदानी खेळ, पार्क मध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. घरात एकाच जागी जास्त वेळ बसू नका. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही कमी होते. (Unsplash)