Easy and Beautiful Rangoli Designs for Diwali: दिवाळी म्हटली की अंगणात, दाराच्या समोर, देवाजवळ विविध ठिकाणी महिला आकर्षक रांगोळी काढतात. पण यावर्षी नेहमीची ठिपक्यांची रांगोळी काढायची नसेल तर तुम्ही या आकर्षक डिझाईन काढू शकता. पाहा फोटो
(1 / 14)
ही रांगोळी तुम्ही अंगणात काढू शकता. यात तुम्हाला हवे ते रंग भरता येतात.
(2 / 14)
ही डिझाईन काढा. रांगोळीच्या मध्यभागी आणि आजूबाजूला दिवे लावून तीला आणखी आकर्षक बनवा.
(3 / 14)
तुमच्या घरासमोर मोठे अंगण असेल तर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. यात भरपूर दिवे लावू शकता.
(4 / 14)
तुम्हाला रांगोळी काढायला वेळ नसेल तर तुम्ही झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांची ही रांगोळी काढू शकता. हे तुम्ही देवासमोरही काढू शकता.
(5 / 14)
तुम्हाला नेहमीची रंगांची रांगोळी काढायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही फुलांची रांगोळी काढू शकता. यात विविध रंगातील फुलांच्या पाकळ्या, पानांचा वापर करा.
(6 / 14)
दिवाळीसाठी ही सोपी रांगोळी आहे. तुम्ही यात आवडीनुसार रंग भरु शकता.
(7 / 14)
तुमच्याकडे रांगोळी काढायला जास्त वेळ नसेल तर तुम्ही ही रांगोळी झटपट काढू शकता. तुम्ही हे पूजेच्या ठिकाणी सुद्धा काढू शकता.
(8 / 14)
फुलांची आणि दिव्याची ही रांगोळी खूप आकर्षक दिसते. यासाठी रंगाची देखील आवश्यकता नाही.
(9 / 14)
ही सोपी रांगोळी तुम्ही लवकर काढू शकता. दिव्यांची ही रांगोळी सुंदर दिसते.
(10 / 14)
ही रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला रांगोळी किंवा रंग लागत नाही. भरपूर दिवे आणि थोडाशा फुलांनी आकर्षक डिझाईन काढता येते.
(11 / 14)
तुम्ही दिवाळीच्या विविध दिवशी या डिझाईन काढू शकता. (twitter/@sphavisha)
(12 / 14)
अंगणात काढलेली ही मोठी डिझाईन खूप सुंदर दिसते. (twitter/@Ruchikakumari8)
(13 / 14)
तुम्ही ही डिझाईन थोडाशा जागेत सुद्धा काढू शकता. ही रांगोळी काढायला जास्त वेळ लागत नाही. (twitter/@Ruchikakumari8)
(14 / 14)
दिवाळीला नेहमीच्या ठिपक्यांच्या रांगोळी ऐवजी या डिझाईन काढून तुम्ही तुमचे घर सजवू शकता.