मराठी मालिकांचा २५व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. यामध्ये २५व्या आठवड्याच्या टॉप ५ मराठी मालिका कोणत्या आहेत याची यादी पाहायला मिळत आहे.
ठरलं तर मग: या वर्षाच्या २५व्या आठवड्यातही सायली-अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने बाजी मारली आहे. या मालिकेला ६.९चे टीआरपी रेटिंग मिळाले असून, ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुन यांचे नाते एका खास वळणावर आल्याचे पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या कराराची फाईल आता प्रियाच्या हाती लागली आहे.
थोडं तुझं आणि थोडं माझं: नुकतीच सुरू झालेली ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात टॉप २वर आली आहे. या मालिकेला पहिल्याच आठवड्यात ६.८चे टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत एक हटके कथानक पाहायला मिळत आहे. या मालिकेला पहिल्याच आठवड्यात उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
लक्ष्मीच्या पाऊलांनी: कला आणि अद्वैत यांची फुलत चाललेली प्रेमकथा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेला २५व्या आठवड्यात ६.७चे टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेने टीआरपी शर्यतीत तिसरे स्थान पटकावले आहे. या मालिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना दिसत आहे.
प्रेमाची गोष्ट: मुक्ता आणि सागरची कथा म्हणजेच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने २५व्या आठवड्यात चौथे स्थान मिळवले आहे. या मालिकेला ६.६चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत सध्या खूप रंजक कथानक पाहायला मिळत आहे. मुक्ता आणि सागर यांच्यातील प्रेमकथा आता बहरताना दिसत आहे. एकीकडे सावनी दोघांच्या नात्यात अडथळे आणू पाहतेय, तर सागर आणि मुक्ता मात्र आपली संसारवेल फुलवत आहे.
घरोघरी मातीच्या चुली: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. या मालिकेला २५व्या आठवड्यात ६.०चे टीआरपी रेटिंग मिळाले असून, ही मालिका ५व्या स्थानावर आहे. या मालिकेत सध्या सौमित्रच्या लग्नावरून चांगलाच धुमाकूळ झालेला पाहायला मिळत आहे. तर, ऐश्वर्या सौमित्रचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करणार आहे.