वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कोणताही ग्रह एका विशिष्ट कालावधीसाठी अनुक्रमे १२ राशींमध्ये संक्रमण करतो. त्याचवेळी नऊ पैकी तीन ग्रह एकाच राशीत असताना त्रिग्रही योग तयार होतो. येत्या काळात हा योग तयार होत असून गुरूच्या मीन राशीत ३ ग्रह एकत्र येणार आहेत. त्रिग्रही योगाच्या निर्मितीमुळे १२ पैकी ५ राशीच्या लोकांचे जीवन बदलणार आहे. याचा सकारात्मक परिणाम होईल ज्यामुळे आपली संपत्ती वाढण्यास तसेच समाजात मान-सन्मान वाढण्यास मदत होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार बुध, रवि आणि शनी मीन राशीत एकत्र बसणार असल्याने ५ राशीचे लोक सुख उपभोगणार आहेत. चला जाणून घेऊया कधी तयार होईल त्रिग्रही योग आणि कोणत्या आहेत ५ भाग्यशाली राशी.
ज्योतिषशास्त्रानुसार बुध गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी मीन राशीत संक्रमण करेल आणि ७ मे २०२५ पर्यंत या राशीत राहील. या दरम्यान सूर्य १४ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश करेल. यानंतर २९ मार्च २०२५ रोजी शनी मीन राशीत प्रवेश करेल. अशा तऱ्हेने मीन राशीत तिन्ही ग्रह एकत्र येतील, त्यामुळे सूर्य, बुध आणि शनी एकत्र येतील आणि त्रिग्रही योग तयार होईल.
वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांचे नशीब उज्ज्वल होऊ शकते. नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक दृष्टीने त्रिग्रही योग निर्मिती फायदेशीर ठरेल. घर आणि मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी सुधारणा होऊ शकते. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात फायदा होऊ शकतो. न झालेली कामे पूर्ण होतील आणि यशही मिळेल.
सिंह :
त्रिग्रही योगाच्या निर्मितीमुळे सिंह राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. परीक्षेत यश मिळू शकते. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी बॉसची मदत मिळेल. आत्मविश्वास वाढू शकतो. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी वेळ चांगला आहे.
धनु :
धनु राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग लाभदायक ठरेल. जीवनात चालू असलेल्या समस्या सोडविता येतील. तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळू शकते. दांपत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील. मालमत्तेशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. अविवाहित लोकांसाठी काळ चांगला राहील.
कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग खूप चांगला ठरणार आहे. रवी, बुध आणि शनी यांच्या कृपेने सर्व कामे पूर्ण होतील. कोणत्याही न्यायालयीन खटल्यात यशस्वी व्हाल. कर्जातून सुटका होईल. यावेळी दिलेले कोणतेही पैसे परत येतील. बराच काळ रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. नोकरीत प्रगती होऊ शकते.
मीन :
मीन राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग लाभदायक ठरेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते. जर तुम्ही एखादे काम बराच काळ पूर्ण करू शकत नसाल किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला राहील.