जेव्हा एका राशीत ३ ग्रह एकत्र येतात, तेव्हा त्रिग्रही योग तयार होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. लवकरच त्रिग्रही योग निर्माण होणार आहे, जो काही राशींना चांगलाच लाभणार आहे. यावेळी सूर्य, शुक्र आणि बुध ग्रह एकत्र येणार आहेत.
बुध, शुक्र आणि सूर्य एकाच राशीत आल्यावर काही राशींना भरपूर लाभ मिळणार आहे. १६ ऑगस्टला सिंह राशीत शुक्र, रवि आणि बुध एकत्र येत आहेत. हे तिन्ही ग्रह एकाच राशीत फिरत असल्याने काही राशींना भरपूर लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…
धनु: धनु राशीसाठी बुध, शुक्र आणि रवि त्रिग्रह योग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. उत्पन्न वाढवण्याचे अनेक नवे मार्ग सापडतील. प्रत्येक कार्यात यश मिळेल. व्यावसायिक जीवनात काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील. त्याचबरोबर जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल.
सिंह: शुक्र, रवि आणि बुध यांचा त्रिग्रह योग सिंह राशीसाठी अनुकूल आहे. या काळात तुम्ही खूप सकारात्मक राहाल, तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल उत्साही असाल, तुम्हाला धार्मिक कार्यात रस निर्माण होईल, आरोग्य ही चांगले राहील आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवाल.
वृश्चिक: बुध, शुक्र आणि रवि यांचा सिंह राशीत प्रवेश वृश्चिक राशीसाठी फायदेशीर ठरेल. ग्रहांच्या हालचालीत बदल झाल्याने या राशीला धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रेम जीवनात मधुरता येईल. कठीण काळात कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.