
सकाळ असो वा दुपार, तुमच्या घरातील छोटा सदस्य दूध दिसल्यावर काहीतरी बहाणा करतो का? दूध प्यायला नकार दिला की काय करावे हे समजत नाही. या ख्रिसमसला काही सोप्या दुधाच्या रेसिपीनी तुमच्या मुलाला खुश करा.
कढईत तूप टाका, थोडे मैदा घाला आणि परतून घ्या. आता एका कढईत दूध गरम करा. गरम झाल्यावर त्यामध्ये पीठ, केशर, वेलचीचे दाणे टाका. छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर वर पिस्ता बदाम घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.
पिस्ते, बदाम, काजू आणि पिठी साखर मिक्स करून एक मिश्रण बनवून घ्या. जेव्हा मसाला दूध प्यायचे असेल तेव्हा ही पावडर दुधात घाला आणि उकळवा यामध्ये थोडसं मधही घाला.
हॉट चॉकलेट - घरी गरम दुधात हॉट चॉकलेट घाला. त्यावर व्हीप्ड क्रीम पावडर फेटून वर घाला. त्यावर थोडे चॉकलेट क्रश करून टाकू शकता.


