Travis Head Birthday : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड याचा आज (२९ डिसेंबर) वाढदिवस आहे. हेड सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालक खेळत आहे.
(1 / 5)
विशेष म्हणजे या मालिकेत सर्वाधिक करणारा फलंदाज आहे. त्याने ४ कसोटी सामन्यांच्या ८ डावात ४११ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने दोन शतकेही झळकली आहेत. भारताविरुद्ध हेडचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे.
(2 / 5)
ट्रॅव्हिस हेड याची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि मॉडेल जेसिका डेव्हिस यांनी प्रदीर्घकाळ डेट केल्यानंतर २०२३ मध्ये लग्न केले. दोघांनी १५ एप्रिल रोजी ॲडलेडमध्ये लग्न केले.
(3 / 5)
त्याआधी ट्रॅव्हिस आणि जेसिका यांची मार्च २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली होती. यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये दोघेही एका गोंडस मुलीचे पालक झाले. जेसिकाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून लग्नाची बातमी दिली होती.
(4 / 5)
ट्रॅव्हिस हेड आणि जेसिका डेव्हिस मे २०२२ मध्ये एका विमान अपघातातून थोडक्यात बचावले होते. दोघेही सुट्टीसाठी मालदीवला गेले होते. त्यावेळी जेसिका गरोदर होती.
(5 / 5)
सोशल मीडियावर या घटनेचा खुलासा करताना जेसिकाने मालदीवमधून परतत असताना विमानात काहीतरी समस्या निर्माण झाल्याचे सांगितले होते. उड्डाणानंतर अर्ध्या तासाने विमानाने एका बेटावर आपत्कालीन लँडिंग केले.
(6 / 5)
लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात आमचे विमान घसरले आणि एका मोकळ्या मैदानावर गेले. जेसिका डेव्हिस म्हणाली, हा प्रकार एका चित्रपटासारखे वाटत होते. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो.