Travel Guide: भटकंतीची आवड असेल तर केरळमधील या ठिकाणांना आवर्जून द्या भेट, स्वर्गासारखे वाटेल-travel guide best places to visit in kerala know the best time for travelling ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Travel Guide: भटकंतीची आवड असेल तर केरळमधील या ठिकाणांना आवर्जून द्या भेट, स्वर्गासारखे वाटेल

Travel Guide: भटकंतीची आवड असेल तर केरळमधील या ठिकाणांना आवर्जून द्या भेट, स्वर्गासारखे वाटेल

Jan 29, 2024 11:59 PM IST
  • twitter
  • twitter
  • Places To Visit in Kerala: तुम्हाला फिरायला आवडत असेल आणि या काळात फिरण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन शोधत असाल तर केरळ तुमच्यासाठी योग्य आहे. येथे कोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकता ते पाहा.
या सीझनमध्ये फिरण्यासाठी एखादे बेस्ट डेस्टिनेशन शोधत असाल तर केरळ तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय असू शकतो. येथे सुंदर दृश्यांसह तुम्हाला चहा आणि कॉफीचे अनेक प्रकार आणि मसाल्यांचा सुवासिक वास अनुभवता येईल. तुम्ही फॅमिली ट्रीपवर असाल किंवा हनिमूनला, या राज्यातील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला नक्कीच मोहित करेल.
share
(1 / 6)

मुन्नार - जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर मुन्नार तुमच्यासाठी परफेक्ट पर्यटन स्थळ असू शकते. आपल्या सुंदर टेकड्यांव्यतिरिक्त मुन्नार त्याच्या चहाच्या बागांसाठी देखील प्रसिद्ध आहे. येथील इको पॉइंटवर अनेक प्रकारचे उपक्रम होतात. 
share
(2 / 6)

वर्कला - केरळमधील प्रसिद्ध ठिकाणांमध्ये वर्कलाचे नाव देखील समाविष्ट आहे. येथे समुद्रकिनारा, दूरवर पसरलेला समुद्र, पर्वत आणि समुद्राची आश्चर्यकारक दृश्ये तुमचे मन जिंकतील. 
share
(3 / 6)

कोची - कोचीचे समुद्रकिनारे, नारळाचे झाड आणि रात्रीची लाइटिंग तुम्हाला भुरळ घालू शकतात. जर तुम्हाला समुद्रातील खजिन्यापासून बनवलेले दागिने घालण्याची हौस असेल तर हे ठिकाण त्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
share
(4 / 6)

थेक्कडी - हे हिल स्टेशन इडुक्की जिल्ह्यात आहे. पेरिअर वन्यजीव अभयारण्यसाठी हे ठिकाण लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हे २०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा अधिवास आहे. जर तुम्हाला घनदाट जंगलातून नदी ओलांडायची इच्छा असेल तर येथे येऊन तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. येथे बोटी भाड्याने देखील उपलब्ध आहेत.
share
(5 / 6)

श्री पद्मनाभस्वामी मंदिर - केरळमधील धार्मिक स्थळांमध्ये या मंदिराने स्वतःची पकड कायम ठेवली आहे. भगवान विष्णूचे हे मंदिर मोठ्या कलात्मकतेने बांधण्यात आले आहे. जिवंत वाटणारी शिल्पे आणि उत्कृष्ट वास्तुकला मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्याला चैतन्य निर्माण करते. असे मानले जाते की हे देशातील सर्वात जुने विष्णू मंदिर आहे. 
share
(6 / 6)

इतर गॅलरीज