
Coromandel Express Train Accident Odisha : ओडिशातील बालासोरमध्ये झालेल्या तीन रेल्वेंच्या विचित्र अपघातात आतापर्यंत २८८ प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. तसेच एक हजारापेक्षा जास्त जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(PTI)Train Accident Odisha : भारतीय लष्कर, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांकडून घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे.
(PTI)Odisha Train Accident : मृतांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे.
(PTI)odisha train accident today : पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली आहे. त्यानंतर मोदींसह अन्य नेत्यांनी जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
(AP)Coromandel Express Accident : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे. मिदनापूर येथून १०० डॉक्टरांचं पथक बालासोरमध्ये रवाना करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी रेल्वेमंत्र्यांवर मोठा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
(AP)odisha train accident reason : बालासोरमध्ये अपघातग्रस्त रेल्वेंना रुळांवरून बाजूला हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातानंतर १६ पेक्षा जास्त रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे.
(AP)train accident in odisha : मृतांच्या नातेवाईकांना घटनास्थळी पोहचण्यासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचं काम जारी आहे.
(AP)




