आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांचे नेत्यांची कर्नाटकातील बंगळुरुत महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.
(Shrikant Singh)कॉंग्रेसच्या प्रमुख भूमिकेत विरोधी पक्षांची बैठक पार पडत आहे. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत सहभागी झाले.
(Shrikant Singh)भाजपची देशातील १६ राज्यांमध्ये सत्ता नाहीये, त्या राज्यांमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी विरोधी पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे.
(Shrikant Singh)झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं विरोधकांच्या बैठकीत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्वागत केलं.
(HT)जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या देखील विरोधकांच्या बैठकीसाठी बंगळुरुत पोहचल्या आहे.
(HT)बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे देखील बंगळुरुत दाखल झाले आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील प्रमुख नेते अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव आणि नीतीश यांची उपस्थिती कॉंग्रेससाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
(HT)