संपूर्ण आठवडा धकाधकीमध्ये घालवल्यानंतर, अखेरीस वीकेंड आला आहे आणि आता बाहेर जाण्याऐवजी घरी बसून कॉफी पीत, ओटीटीवर कोणत्या चित्रपटांचा आनंद घ्यायचा याबद्दल तुम्ही संभ्रमात आहात का? चला तर मग या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया जे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.
कल्की २८९८ एडी: या यादीत पहिले नाव आहे प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन स्टारर चित्रपट 'कल्की २८९८ एडी'. चित्रपटगृहांमध्ये ब्लॉकबस्टर कमाई करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आणि आता तुम्ही नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये त्याचा आनंद घेऊ शकता.
गर्र्र: डिस्ने प्लस हॉटस्टार गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ‘गर्र्र’ची जाहिरात करत आहे. प्राणीसंग्रहालयात दारू पिऊन एक माणूस सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारतो, असे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. मजेशीर असलेल्या या चित्रपटात दमदार कॉमेडी आणि ड्रामा आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.
अँग्री यंग मॅन: जर तुम्हाला थोडा नॉस्टॅल्जिया अनुभवायचा असेल, तर तुम्ही प्राईम व्हिडीओवरील ‘अँग्री यंग मॅन’ ही डॉक्युसीरीज देखील पाहू शकता. त्या काळातील सुपरहिट जोडी सलीम-जावेदचा प्रवास तुम्हाला ९०च्या दशकातील फिल्मी दुनियेबद्दल खूप काही सांगून जातो.
रायन: साऊथचा स्टार अभिनेता धनुष आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्रात जीव ओततो. तुम्हाला ॲक्शन आणि थ्रिलरने भरलेले काहीतरी पाहायचे असेल, तर प्राईमवरील 'रायन' हा सर्वोत्तम पर्याय आहे. एक मुलगा जो आपल्या कुटुंबाच्या खुन्यांना शोधून मारण्याच्या मोहिमेवर आहे.
द फ्रॉग: 'द फ्रॉग' नुकतेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर देखील रिलीज करण्यात आले आहे, ज्याला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टचा एक भाग बनवू शकता. थ्रिलरने भरलेला हा कोरियन ड्रामा एका जमीनदाराची कथा सांगतो, ज्याचे जीवन एका रहस्यमय स्त्रीच्या आगमनाने पालटून जाते.