
पुष्पा २ ने अनेक विक्रम मोडले आहेत. या निमित्ताने अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची तुलना कोविडनंतर प्रदर्शित झालेल्या मोठ्या चित्रपटांशी केली जात आहे. रिलीजच्या दुसऱ्या रविवारी पुष्पा २ ने भारतात ४ कोटींचा गल्ला पार केला. म्हणजे ४ कोटींहून अधिक लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले होते. कोरोनानंतर प्रदर्शित झालेल्या टॉप चित्रपटांपैकी एक असून या यादीत कोणते इतर सिनेमे आहेत चला जाणून घेऊया…
पुष्पा 2 हा 2024 मधील सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. रिलीजच्या दुस-या रविवारी हा चित्रपट पाहण्यासाठी ४ कोटी प्रेक्षकांनी हजेरी लावली.
रणबीर कपूर स्टारर चित्रपट ॲनिमल हा कोविडनंतर सर्वाधिक पाहिलेला सिनेमा ठरला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी ३.३० कोटी प्रेक्षक उपस्थित होते.
कोरोनानंतर शाहरुख खानचा पठाण चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी झाली होती. हा चित्रपट ३.५० कोटी लोकांनी पाहिला.


