संजय कपूरची पत्नी महीप हिनेही सांगितले होते की, जेव्हा तिला संजयचे कुठेतरी अफेअर असल्याचे समजले तेव्हा तिने शनायासोबत घर सोडले. पण मुलगी लहान असल्यामुळे तिला शनायाला वडिलांपासून दूर करायचे नव्हते. म्हणून ती परत आली आणि काही दिवसांनी सर्व काही ठीक झाले.
नीतू कपूरने काही मुलाखतींमध्ये असेही म्हटले आहे की तिला तिच्या पतीच्या फ्लर्टिंग आणि वन नाईट स्टँडबद्दल माहिती होती. पण ऋषी घरी परतणार याची तिला खात्री होती.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरचे अनेक किस्से चर्चेत राहिले आहेत. असे वृत्त आहे की जया बच्चन यांनी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मोठी भूमिका घेतली होती. त्यांनी रेखाला सांगितले होते की अमिताभ बच्चन यांना सोडून त्या कुठेही जाणार नाही.


