'पुष्पा 2: द रुल' व्यतिरिक्त सात भारतीय चित्रपटांनी १००० कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटांबद्दल…
या यादीत अभिनेता आमिर खानचा 'दंगल' पहिल्या क्रमांकावर आहे. आजपर्यंत एकही चित्रपट 'दंगल'चा विक्रम मोडू शकलेला नाही. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर २०७०.३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभासच्या 'बाहुबली २' चित्रपटाने १७८८.०६ कोटींची कमाई करून या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
या यादीत राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा चित्रपट 'RRR' तिसऱ्या स्थानावर आहे. याने जगभरात १२३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
या यादीत शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या 'जवान'नेही आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या चित्रपटाने जगभरात ११६० कोटींची कमाई केली होती.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या 'पठाण' चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर १०५५ कोटींचा व्यवसाय केला आहे.