बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सैफने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला सैफच्या अशा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही पाहिले नसतील तर वेळ काढून नक्की पाहा...
या यादीत पहिले नाव सैफ अली खानच्या 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाचे आहे. सूरज बडजात्याच्या या कौटुंबिक चित्रपटात सैफशिवाय सलमान खान, करिश्मा कपूर, तब्बू, मोहनीश बहल, सोनाली बेंद्रे यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स, झी ५ किंवा अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.
दिग्दर्शक कुणाल कोहलीच्या ‘हम तुम’ या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील दोघांचा अभिनय खूप आवडला होता. तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर हा सिनेमा पाहू शकता.
या यादीत सैफच्या तान्हाजीचाही समावेश आहे. या चित्रपटातील सैफच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. यामध्ये सैफसोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. तुम्ही हा चित्रपट डिस्झ्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
सैफ अली खानचा परिणीता हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे विद्या बालनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सैफ आणि विद्याशिवाय या चित्रपटात संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तुम्ही हा सिनेमा प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
निर्माता विशाल भारद्वाज यांचा ओंकारा हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सैफशिवाय अजय देवगण, करीना कपूर, कोंकणा सेन शर्मा, विवेक ओबेरॉय आणि बिपाशा बसू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.