आज आम्ही तुम्हाला अशा हॉलिवूड चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्याचे काही भाग भारतात शूट करण्यात आले आहेत. या यादीत हॉलिवूड दिग्दर्शकांनी शूट केलेल्या चित्रपटांची नावे देखील समाविष्ट आहेत. तर, यापैकी काही चित्रपटांमध्ये बॉलिवूड स्टार देखील दिसले होते. तसेच, या चित्रपटांचे शूटिंग भारतात झाले होते.
२०१२च्या 'डार्क नाइट राइजेस'मधील एक दृश्य, जिथे बॅटमॅन तुरुंगातून पळून जातो, ते जोधपूरच्या मेहरानगड किल्ल्यामध्ये चित्रित करण्यात आला होते. या चित्रपटाचे IMDb रेटिंग ८.४ आहे.
२००८मध्ये प्रदर्शित झालेल्या डॅनी बॉयलच्या 'स्लमडॉग मिलेनियर'चे चित्रीकरण मुंबईतील जुहू येथील झोपडपट्टीत झाले होते. या चित्रपटात अनिल कपूर, इरफान खानसह अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले होते. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८ आहे.
आंग ली दिग्दर्शित 'लाईफ ऑफ पाय' या चित्रपटात इरफान खान, आदिल हुसैन आणि सूरज शर्मा सारखे कलाकार दिसले होते. या चित्रपटाचे शूटिंग पुद्दुचेरी आणि केरळसह भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे. त्याचे आयएमडीबी रेटिंग ७.९ आहे.
'द बॉर्न सुप्रीमसी' हा चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला होता. गोव्यातील वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्याचे आयएमडीबी रेटिंग ७.७ आहे.
कॅथरीन बिगेलोच्या 'झिरो डार्क ३०'चे आयएमडीबी रेटिंग ७.४ आहे. या चित्रपटाचे काही भाग भारतातील चंदीगड येथे शूट करण्यात आले आहेत.
'मिशन इम्पॉसिबल : घोस्ट प्रोटोकॉल' हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे शूट मुंबईत करण्यात आले होते. या चित्रपटात अनिल कपूरही दिसला होता. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.४ आहे.