Top Podcast List: आजच्या काळात लोकांकडे सर्व प्रकारचे करमणुकीचे साहित्य आहे. चित्रपट, मालिकांनंतर पॉडकास्ट देखील प्रेक्षकांना आवडतात. कोणते टॉप रेटिंग पॉडकास्ट आहेत चला जाणून घेऊया...
(1 / 5)
जर तुम्हाला पॉडकास्ट ऐकण्याची आवड असेल, तर आज आम्ही तुम्हाला IMDb च्या सर्वाधिक रेटिंग असलेल्या पॉडकास्टबद्दल सांगणार आहोत. या यादीमध्ये कोणते पॉडकास्ट आहेत चला जाणून घेऊया…
(2 / 5)
या यादीत पहिले नाव स्टीफन वेस्टचा फिलॉसॉफाइज दिस आहे. जर तुम्हाला तत्वज्ञानात रस असेल तर तुमच्यासाठी हे एक उत्तम पॉडकास्ट आहे. त्याचे IMDb रेटिंग ९.८ आहे. तुम्ही ते Spotify वर ऐकू शकता.
(3 / 5)
द स्टोरीज ऑफ पॉडकास्टचे IMDb रेटिंग ९.७ आहे. या पॉडकास्टमध्ये तुम्हाला महाभारतातील विविध कथा जाणून घेण्याची संधी मिळेल. तुम्ही ते Spotify वर ऐकू शकता.
(4 / 5)
ह्युबरमन लॅब पॉडकास्टचे IMDb रेटिंग ९.४ आहे. तुम्ही हे पॉडकास्ट Spotify आणि YouTube वर ऐकू शकता. हे आरोग्याशी संबंधीत पॉडकास्ट आहे. डॉ. ह्युबरमन यांच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हाला मानसिक आरोग्याविषयी माहिती मिळेल.
(5 / 5)
द एनिथिंग गोज विथ एम्मा चेंबरलेन पॉडकास्टचे IMDb रेटिंग ९.४ आहे. हे स्व-सुधारणा पॉडकास्ट आहे. तुम्ही ते Spotify वर ऐकू शकता.