
अजय देवगणचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन'चा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. जर तुम्हाला कॉप चित्रपट आवडत असतील तर आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगणार आहोत ज्यामध्ये मुख्य नायक एक पोलीस अधिकारी आहे. या सर्व चित्रपटांना बॉक्स ऑफिस आणि समीक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले.
'सिंघम अगेन' हा चित्रपट पाहणार असाल आणि सिंघम मालिकेतील आधीचे चित्रपट पाहिले नसतील तर मजा नाही. म्हणून, प्रथम तुम्ही सिंघम, सिंघम रिटर्न्स, सिम्बा आणि सूर्यवंशी पहा
तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी याने काही फरक पडत नाही, तुम्ही राणी मुखर्जीचा 'मर्दानी' हा कॉप चित्रपट जरूर पाहावा. चित्रपटाची कथा थ्रिलर आणि ॲक्शनने भरलेली असून एका लेडी कॉपची ही कथा तुम्हाला पाहायला आवडेलय
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या सरफरोश या चित्रपटालाही टॉप कॉप चित्रपटांमध्ये स्थान मिळाले पाहिजे. या चित्रपटात आमिर खानने एसीपी अजय सिंह राठोड यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्या काळातील ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांमध्ये गणला जातो.


