हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांनी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. अशीच एक जोडी होती ती म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. दोघांनी एक नाही तर अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. आज आम्ही तुम्हाला रेखा आणि अमिताभ बच्चनच्या अशा ७ चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही एकदा बघेलच हवेत.
रेखा आणि अमिताभ यांचे 'दो अनजाने'हा चित्रपट १९७६ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट एका अशा जोडप्याची कथा आहे जे जवळच्या मित्राने आपल्या पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर वेगळे होतात. दुलाल गुहा दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यासोबत प्रेम चोप्रा, प्रदीप कुमार, उत्पल दत्त, ललिता पवार यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
'खून पसीना' हा चित्रपट अमिताभ आणि रेखा यांचा सुपरहिट चित्रपट म्हणून आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात बिग बी एका वाघाशी उत्कटतेने लढतात. या चित्रपटाची कथा एकमेकांपासून विभक्त झालेल्या दोन जिवलग मित्रांच्या आयुष्याभोवती फिरते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा, विनोद खन्ना, निरुपा रॉय, असरानी, अरुणा इराणी, भारत भूषण, कादर खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
वजाहत मिर्झा १९७८मध्ये रिलीज झालेल्या 'गंगा की सौगंध'चे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा, अमजद खान, प्राण, आय.एस. जोहर, बिंदू, अंजू महेंद्रू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक प्रकाश मेहराच्या 'मुकद्दर का सिकंदर'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी हा एक आहे. हा शेवटचा चित्रपट होता ज्यात बिग बी आणि विनोद खन्ना यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा, विनोद खन्ना, राखी, रणजीत, अमजद खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
अमिताभ बच्चन, रेखा यांचा 'मिस्टर नटवरलाल' हा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. हा चित्रपट मिस्टर नटवरलाल नावाच्या प्रसिद्ध भारतीय ठगावर बनवला होता. या चित्रपटात बिग बी आणि रेखा यांच्याशिवाय अजित, कादर खान, अमजद खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा 'सुहाग' हा चित्रपट एकदा नक्कीच पाह्यला हवा. 'सुहाग' हा १९७९च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. रेखा अमिताभसोबत शशी कपूर, परवीन बॉबी, अमजद खान, निरुपा रॉय, कादर खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.