बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी इतर देशांतून येऊन येथे आपला ठसा उमटवला आणि नाव कमावण्यासोबतच या देशाची मानही गौरवाने उंचावली. चला तर मग, जाणून घेऊया त्या अभिनेत्यांविषयी जे निर्वासित किंवा स्थलांतरित म्हणून भारतात आले आणि नंतर इथेच राहून सिनेविश्वात खूप नाव कमावले.
'बॉलिवुडचे शोमन' म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत चित्रपट दिग्दर्शक राज कपूर यांना परिचयाची गरज नाही. ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक राज कपूर यांनी भारतात सिनेमा प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा जन्म पेशावरच्या ढक्की मुनाव्वर येथे झाला हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे वडिलोपार्जित घर पाकिस्तानात आहे. मात्र, ते १९३० मध्ये मुंबईत आले आणि त्यानंतर ते येथेच राहिले.
बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेनचे नाव तुम्ही ऐकले असेलच. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्रीला बॉक्स ऑफिस क्वीन म्हटले जायचे. या अभिनेत्रीचा जन्म बांगलादेशात झाला आणि नंतर भारतात येऊन त्यांनी इथे खूप नाव कमावले.
भारतामध्ये दिलीप कुमार या नावाने प्रसिद्ध असलेल्या युसूफ खान यांना 'बॉलिवुडचा बादशाह' म्हटले जायचे. दिलीप कुमार यांच्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टी अपूर्ण आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की, या दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याचा जन्म पेशावरमध्ये झाला आणि १९३०मध्ये ते भारतात आले आणि इथेच राहिले.
उत्पल दत्त हे एक उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक आणि नाटककार होते. उत्पल दत्त हे हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांचा जीव असायचे. त्यांचा जन्म बांगलादेशातील बारिशाल येथे झाला हे फार लोकांना माहीत आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदाही कादर खान यांना आपला गुरू मानत होता. कादर खान एक अप्रतिम पटकथा लेखक आणि अभिनेते होते. कादर खान १९४२मध्ये अफगाणिस्तानातून भारतात आले आणि त्यानंतर येथेच राहिले.
बॉलिवूडचा बॅडमॅन म्हणून प्रसिद्ध असलेला गुलशन ग्रोव्हरही पाकिस्तानातून रावळपिंडीहून भारतात आला होता. १९४७च्या फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने भारतात येण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर ते येथेच राहिले.