Top 6 Cartoon: तुम्हाला लहानपणी कार्टून बघण्याची आवड होती आणि आता वाईट कंटेंटमुळे तुम्ही कार्टून पाहू शकत नसाल तर ही गॅलरी नक्की पाहा. तुम्हाला आवडतील अशा शो विषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
(1 / 5)
घरातील लहान मूल कार्टून शो पाहत असताना आपल्याला देखील पाहावे लागतात. पण कधी कधी हे कार्टून शो अतिशय रटाळ आणि कंटाळवाणे असतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही शो विषयी सांगणार आहोत जे मुलांसोबत तुम्हीही पाहू शकता..
(2 / 5)
या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे 'बोजैक होर्समैन.' हे कार्टून तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या कार्टून शोला IMDb वर ८.८ रेटिंग मिळाले आहे. जीवनाच्या तणावामुळे नशेच्या आहारी गेलेल्या घोड्याची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे.
(3 / 5)
'रिक अँड मॉर्टी' नावाचा कार्टून शो फक्त OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या कार्टूनमध्ये एका आजोबा आणि नातवाची कथा आहे. आजोबा दारुड्या शास्त्रज्ञ आणि नातू खूप खोडकर आहे. आजोबा त्यांच्या नातवावर सर्व प्रयोग करतात.
(4 / 5)
आर्चर नावाचा हा कार्टून शो अॅमेझॉन प्राईमवर आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित सुरु आहे. या शोची कथा 8 गुप्तहेरांची आहे. ॲक्शन, थ्रिलर आणि लॉजिकने परिपूर्ण असलेला हा कार्टून शो मुलांसाठी तसेच प्रौढांसाठीही योग्य आहे.
(5 / 5)
तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर 'द सिम्पसन्स' या कार्टून शोचे नाव तुम्ही ऐकले असेलच. या शोबद्दल अनेक रहस्ये असून निर्मात्याने ॲनिमेशनच्या मदतीने भविष्याची झलक दिल्याचे सांगितले जाते.
(6 / 5)
'फैमिली गाय' हा कार्टून शो डिस्नेप्लस हॉटस्टारवर सुरु आहे. या कार्टूनचा २२वा सिझन सध्या सुरु आहे.