रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएल २०१६ मध्ये ३ बाद २४८ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाच्या या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी शतके झळकावली होती.
(BCCI)लखनौ सुपरजायंट्सने आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध ५ बाद २५७ धावा केल्या. सर्वाधिक धावसंख्येच्या यादीत लखनौचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. स्टोयनिसने त्या सामन्यात ७२ धावांची खेळी केली होती.
(AP)आरसीबीने २०१३ च्या आयपीएलमध्ये २६३ धावा केल्या होत्या. हंगाम सुरू होईपर्यंतलीगच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या होती. त्या सामन्यात ख्रिस गेलने १७५ धावांची खेळी केली होती. लीगमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
(BCCI)कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ७ बाद २७२ धावा केल्या. विक्रमी धावसंख्या अवघ्या पाच धावांनी दूर होती. सुनील नारायण, रघुवंशी, रिंकू सिंग आणि रसेल यांनी या सामन्यात चमकदार कामगिरी केली.
(AFP)