आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये यावर्षी २००० धावांचा आकडा अद्याप कोणत्याही फलंदाजाला गाठता आलेला नाही. पण यंदा १५ फलंदाजांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.
कुसल मेंडिस- श्रीलंकेचा कुसल मेंडिस २०२४ मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू आहे. या वर्षी त्याने वनडेमध्ये ७४२ धावा, टी-20 मध्ये ५७२ धावा आणि कसोटीत ४९० धावा केल्या आहेत. मेंडिसने २०२४ मध्ये एकूण १,८०४ धावा केल्या आहेत.
हॅरी ब्रुक- इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने यावर्षी एकूण १,५७४ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत १०९९ धावा, एकदिवसीय सामन्यात ३१२ धावा आणि T20 सामन्यात १६३ धावा केल्या आहेत.
यशस्वी जैस्वाल- भारताच्या यशस्वी जैस्वालने २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण १,६०१ धावा केल्या आहेत. त्याने कसोटी सामन्यात १३०८ धावा आणि T20 मध्ये २९३ धावा केल्या आहेत.
हॅरी ब्रुक- इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने यावर्षी एकूण १,५७४ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत १०९९ धावा, एकदिवसीय सामन्यात ३१२ धावा आणि T20 सामन्यात १६३ धावा केल्या आहेत.