
Ellyse Perry - ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर आहे. तिची एकूण संपत्ती $१४ मिलियन डॉलर्स आहे. पेरीची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.
Meg Lanning - ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिची एकूण संपत्ती $९ मिलियन डॉलर्स आहे. लॅनिंग दरवर्षी १.७ कोटी रुपये कमावते. WPL लिलावात तिला १.१ कोटी रुपयांना विकत घेण्यात आले होते.
Mithali Raj - भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिची एकूण संपत्ती $५ मिलियन डॉलर्स आहे. निवृत्तीनंतर मिताली महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सची मेंटॉर बनली आहे.
Smriti Mandhana - भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिचे वार्षिक वेतन ५० लाख रुपये आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तिचा समावेश होतो. मानधनाची एकूण संपत्ती ४ मिलियन डॉलर्स आहे.
Harmanpreet Kaur - भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला बीसीसीआयकडून दरवर्षी ५० लाख रुपयांचे मानदन दिले जाते. तिची एकूण संपत्ती $३ मिलियन डॉलर्स आहे.
Sarah Taylor - सारा टेलर ही इंग्लंडची माजी यष्टिरक्षक फलंदाज आहे. या यादीत ती सहाव्या क्रमांकावर आहे. तिच्याकडे $ २ मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे.
Holly Ferling - सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू होली फर्लिंग ७व्या क्रमांकावर आहे. होली फेर्लिंगची एकूण संपत्ती $१.५ मिलियन डॉलर्स आहे.
isa guha - इसा गुहा ही इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आहे. तिची एकूण संपत्ती सुमारे $१.५ मिलियन डॉलर्स आहे. २००१ ते २०११ दरम्यान ती इंग्लंडकडून खेळायची. ती सध्या कॉमेंट्री करते.
Sana Mir - सना मीर ही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. तिने २०१९ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तिची एकूण संपत्ती $१.३ मिलियन डॉलर्स आहे.
Dané van Niekerk - डेन व्हॅन निकेर्क दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. तिची एकूण संपत्ती $१ मिलियन डॉलर्स आहे.








