(2 / 10)गौरव चौधरी (टेक गुरुजी) : विविध प्रकारचे मोबाइल, ईलेक्ट्रॉनिक वस्तु, टेक रिव्ह्यूज, गॅझेट अनबॉक्सिंग आणि टेक युज ट्युटोरियल्ससाठी ओळखला जाणारा, गौरव चौधरीचे यूट्यूबवर सर्वाधिक फॅन फॉलोयर्स आहेत. गौरव सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत विविध गॅझेट्सची माहिती त्याच्या चॅनलवर देतो. त्याने बिट्स पिलानी येथून मायक्रोइलेक्ट्रॉनिकमध्ये पदवी प्राप्त केली आहे. सध्या, तो दुबईमध्ये राहतो. यूट्यूबर व उद्योजक म्हणून आज त्याची ख्याती आहे. गौरव चौधरीने २०१५ मध्ये त्यांचे चॅनल ‘टेक्निकल गुरुजी’ सुरू केले आणि अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत त्याने प्रसिद्धी मिळवली. त्याचे सध्या २३.७ दशलक्ष फॉलोयर्स आहेत. तंत्रज्ञानाची सोप्या भाषेत माहिती देऊन त्याने अनेक भारतीयांना आपलेसे केले आहे. त्याच्या कडे ३५६ कोटींची संपत्ती आहे.