झुझुआ कॅपुटोवा, स्लोवाकिया
जुझू कॅपुटोवा या एक स्लोवाकियन राजकारणी, वकील आणि पर्यावरणवादी नेत्या आहेत. त्या २०१९ ते २०२४ पर्यंत स्लोवाकियाच्या राष्ट्रपती देखील राहिल्या आहेत.
जॉर्जिया मेलोनी
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारतात कोणत्याही ओळखीची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. त्या जगातील सर्वात सुंदर आणि हुशार व धोरणी राजकारणी समजल्या जातात.
क्लाउडिया शीनबॉम, मेक्सिको
क्लॉडिया शीनबॉमचे नावही जागतिक पटलावर आजकाल चर्चेत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवरील कर वाढवल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांना थेट उत्तर दिलं आहे.
जोसा उस्मानी, कोसोवो
तुम्ही कोसोवो देशाचे नाव क्वचितच ऐकले असेल. पण एकदा तुम्ही या देशाच्या राष्ट्रपतींचा फोटो पाहिला तर हा देश तुम्हाला नेहमीच आठवणीत राहणार आहे. या देशाच्या अध्यक्षा या जोसा उस्मानी असून त्यांची ओळख धोरणी राजकारणी म्हणून केली जाते.
राणी रानिया, जॉर्डन
जॉर्डनची राणी रानिया या देखील त्यांच्या सौंदर्यासाठी जगभरात चर्चेत असतात. त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात आणि त्या स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतात. त्याचा मोठा फॉलोअर वर्ग आहे.
नताशा पिर्क मुसर, स्लोव्हेनिया
स्लोव्हेनिया येथील नताशा पिर्क मुसार या प्रसिद्ध स्लोव्हेनियन वकील आणि लेखिका आहे. २०२२ पासून त्या त्यांच्या देशाच्या पाचव्या राष्ट्रपती आहेत.
सारा पेलिन, अमेरिका
सारा पेलिन या एक अमेरिकन राजकारणी आहे. त्या अलास्काच्या गव्हर्नर राहिल्या आहेत. याशिवाय, २००८ मध्ये जेव्हा सारा पॅलिन अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत देखील राहिल्या होत्या. त्यामुळे त्या चर्चेत होत्या.
युलिया टिमोशेन्को, युक्रेन
युलिया या दोनदा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष राहिल्या आहेत. युक्रेनमध्ये या सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला राजकारणी आहेत.
हिना रब्बानी खार, पाकिस्तान
हिना रब्बानी खार या पाकिस्तानातील प्रसिद्ध महिला राजकारण्यांपैकी एक आहेत. त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री राहिल्या आहेत. २०११ मध्ये परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी भारत दौऱ्यात केलेल्या व्यक्तव्यावरून त्या चर्चेत राहिल्या होत्या.