
बॉलिवूडमधील विनोदी चित्रपटांचा विचार केला तर सर्वात आधी अभिनेता जॉनी लिवरचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. जर तुम्हाला विकेंडला घरबसल्या कॉमेडी सिनेमा पाहायचा असेल तर जॉनी लिवरचा एखादा चित्रपट पाहणे योग्य निवड ठरेल. चला जाणून घेऊया त्याचे सर्वोत्कृष्ट कॉमेडी सिनेमे कोणते आहेत.
एंटरटेनमेंट हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉनी लिवरने महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुम्ही Zee5 वर पाहू शकता.
हाऊसफुल २ हा एक ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात जॉनी लिवरने विश्वास पाटील यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
खट्टा मीठा हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॉनी लिवरचे नाव अवार्ड अंशुमन होते. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
दे दना दन हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्यांचे नाव होते काला कृष्ण मुरारी. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता. हा चित्रपट चांगलाच गाजला होता.
हेरा फेरी हा बॉलिवूडमधील हिट कॉमेडी सिनेमांपैकी एक आहे. हा सिनेमा २००६मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील जॉनीचे नाव मुन्नाभाई होते. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.
दीवाने हुए पागल हा २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील जॉनी लिवरने मुर्गन नावाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.





