Shravan Somvar : पहिल्या श्रावण सोमवारी करा हे उपाय, नोकरीत येणारे अडथळे होतील दूर
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shravan Somvar : पहिल्या श्रावण सोमवारी करा हे उपाय, नोकरीत येणारे अडथळे होतील दूर

Shravan Somvar : पहिल्या श्रावण सोमवारी करा हे उपाय, नोकरीत येणारे अडथळे होतील दूर

Shravan Somvar : पहिल्या श्रावण सोमवारी करा हे उपाय, नोकरीत येणारे अडथळे होतील दूर

Published Aug 05, 2024 11:40 AM IST
  • twitter
  • twitter
Shravan Remedies In Marathi : यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार व्रत आहेत. या दिवशी जलाभिषेक आणि भोलेनाथाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि महादेवाचा आशीर्वाद मिळतो. असे मानले जाते की, श्रावण सोमवारी काही उपाय केल्यास नोकरी संबंधी अडथळे असतील तर ते दूर होईल.
आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात भगवान शिवासाठी विशेष विधी केले जातात. या महिन्यात भगवान शंकराचे नामस्मरण आणि मनोभावे पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होते. याशिवाय प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाचे व्रत केले जाते. श्रावण सोमवारी काही उपाय केल्यास सर्व त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. 
twitterfacebook
share
(1 / 5)

आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात भगवान शिवासाठी विशेष विधी केले जातात. या महिन्यात भगवान शंकराचे नामस्मरण आणि मनोभावे पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होते. याशिवाय प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवाचे व्रत केले जाते. श्रावण सोमवारी काही उपाय केल्यास सर्व त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. 

((छायाचित्र सौजन्य एपी))
नोकरी मिळत नसेल तर करा हे उपाय : तुम्हाला खूप दिवसांपासून नोकरी मिळत नसेल आणि तुम्हाला संततीची चिंता वाटत असेल, तर भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच श्रावण सोमवारी माता पार्वतीची पूजा करा आणि चांदीच्या वस्तू अर्पण करा. हिंदू मान्यतेनुसार असे केल्याने करिअरच्या समस्यांपासून सुटका मिळते आणि नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तरीही यश मिळत नसेल तर तुम्ही देखील हा उपाय करून पाहू शकता.
twitterfacebook
share
(2 / 5)

नोकरी मिळत नसेल तर करा हे उपाय : 

तुम्हाला खूप दिवसांपासून नोकरी मिळत नसेल आणि तुम्हाला संततीची चिंता वाटत असेल, तर भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच श्रावण सोमवारी माता पार्वतीची पूजा करा आणि चांदीच्या वस्तू अर्पण करा. हिंदू मान्यतेनुसार असे केल्याने करिअरच्या समस्यांपासून सुटका मिळते आणि नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तरीही यश मिळत नसेल तर तुम्ही देखील हा उपाय करून पाहू शकता.

जर तुम्ही विवाहित नसाल तर : तुम्ही खूप दिवसांपासून लग्न न झाल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर श्रावण सोमवारी शिवाचा जलाभिषेक करावा. असे केल्याने वैवाहिक समस्या दूर होतात आणि लवकर विवाह योग जुळून येतील, असे मानले जाते.
twitterfacebook
share
(3 / 5)

जर तुम्ही विवाहित नसाल तर : 

तुम्ही खूप दिवसांपासून लग्न न झाल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर श्रावण सोमवारी शिवाचा जलाभिषेक करावा. असे केल्याने वैवाहिक समस्या दूर होतात आणि लवकर विवाह योग जुळून येतील, असे मानले जाते.

इच्छित जोडीदारासाठी: जर तुम्हाला तुमच्या इच्छित जीवनसाथीशी लग्न करायचे असेल तर तुम्ही सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना दान करणे देखील शुभ आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)

इच्छित जोडीदारासाठी: 

जर तुम्हाला तुमच्या इच्छित जीवनसाथीशी लग्न करायचे असेल तर तुम्ही सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना दान करणे देखील शुभ आहे.

इतर समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी: जर तुम्हीही तुमच्या जीवनातील इतर समस्यांमुळे त्रस्त असाल तर श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची यथायोग्य पूजा करा आणि ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करा.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी: 

जर तुम्हीही तुमच्या जीवनातील इतर समस्यांमुळे त्रस्त असाल तर श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची यथायोग्य पूजा करा आणि ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करा.

इतर गॅलरीज