स्लीव्हलेस घालण्यापूर्वी डार्क अंडरआर्म्सचा प्रॉब्लेम सोडवा, फॉलो करा या टिप्स
- तुम्हाला तुमच्या डार्क अंडरआर्म्सची लाज बाळगण्याची अजिबात गरज नाही. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा या टिप्स.
(1 / 5)
डार्क अंडरआर्म्समुळे अनेक वेळा आपल्याला इम्बॅरेज फील होते. त्यामुळे स्लीव्हलेस कपडे घालायलाही लाज वाटते. अनेक कारणांमुळे तुमचे अंडरआर्म्स काळे होऊ शकतात. पण थोडी काळजी घेतली तर तुम्ही या समस्येपासून मिळू मिळवू शकता.
(2 / 5)
अंडरआर्म्सचे काळे डाग दूर करण्यासाठी लिंबाची तुलना अजून कशाशी होऊ शकत नाही. लिंबाचा एक स्लाइस घेऊन ते अंडरआर्म्सला लावा. थोडा वेळ तसेच राहू द्या आणि नंतर धुवा. तुम्हाला डाग कमी झालेले दिसतील. जसे हे डाग कमी होतात तसेच येथील जंतू देखील नष्ट होतात. परिणामी घामाचा वास येणार नाही.
(3 / 5)
अंडरआर्म्सची डेड स्किन काढून टाकण्यासाठी केमिकल एक्सफोलिएशन वापरा. इथली स्किन अतिशय पातळ असल्याने येथे जास्त स्क्रबर न वापरणे चांगले असते. सिलिकिक अॅसिड फेसवॉशने हे क्लीन करा. आठवड्यातून एकदा एएचए आणि बीएचए सह पीलिंग सोल्यूशन वापरू शकता.
(4 / 5)
लिंबाचा रस, हळद, मैदा हे मिक्स करून पॅक तयार करा. आता हा पॅक क्लीन केलेल्या अंडरआर्म्सवर लावा. १५ ते २० मिनीट तसेच राहू द्या. नंतर धुवून घ्या. आठवड्यातून २ ते ३ दिवस केल्याने फायदा होईल.
(5 / 5)
डियोडरंट, परफ्यूम थेट अंडरआर्म्सवर वापरू नका. सूती कापडासोबत वापरा. त्यामुळे अंडरआर्म्स वरील दाब कमी होईल.
इतर गॅलरीज