थायरॉईडचे आरोग्य हे आपल्या आहारावर आणि आपल्या लाइफस्टइलवर अवलंबून असते. थायरॉइडसाठी पोषक आहाराने भरलेला आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नॅचरोपॅथिक डॉक्टर कोरिना डनलॅप यांनी रोजच्या आहारात कोणत्या पोषक तत्वांचा समावेश केला पाहिजे हे सांगितले आहे.
(Unsplash)सेलेनियम: ब्राझील नट, ऑयस्टर, सार्डिन आणि सॅल्मनमध्ये आढळणारे सेलेनियम थायरॉईडचे आरोग्य राखण्यास मदत करते.
(Unsplash)आयोडीन: हे पोषक तत्व T3 आणि T4 तयार करण्यात मदत करते. मासे, कोळंबी आणि अंडी यामध्ये आढळणारे आयोडीन हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक पोषक तत्व आहे.
(Unsplash)झिंक: शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो. ऑयस्टर, काजू आणि शिंपले झिंकने भरलेले असतात.
(Unsplash)व्हिटॅमिन डी: मशरूम आणि अंडीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन डी हायपोथायरॉईडीझमचा सामना करण्यास मदत करते.
(Unsplash)मॅग्नेशियम: भोपळ्याच्या बिया, तीळ आणि बदामांमध्ये आढळणारे मॅग्नेशियम शरीराला T४ मध्ये T३ रूपांतरित करण्यास मदत करते.
(Unsplash)