ऐश्वर्या रायने करिअरच्या सुरुवातीलाच स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. एखाद्या चित्रपटात ऐश्वर्या असेल, तर तो कौटुंबिक चित्रपट असेल, असे म्हटले जात होते. पण, जेव्हा तिने पहिल्यांदाच चित्रपटात किसिंग सीन दिला, तेव्हा चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता.
ऐश्वर्याने तिचा सुपरहिट चित्रपट 'धूम २' मध्ये पहिल्यांदा किसिंग सीन दिला होता. हा सीन त्याने हृतिक रोशनसोबत चित्रित केला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऐश्वर्याला कायदेशीर नोटीसी मिळू लागल्या होत्या.
खुद्द ऐश्वर्यानेच हा दावा केला होता. ऐश्वर्याने डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी 'धूम' चित्रपटात फक्त एकदाच हा सीन केला होता आणि तो चर्चेचा विषय बनला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या सीनमुळे मला काही कायदेशीर नोटिसाही मिळाल्या आहेत.’
ऐश्वर्या पुढे म्हणाली होती की, ‘लोक मला म्हणत होते की, तू एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेस. आमच्या घरातील महिलांसाठी तू एक उदाहरण आहेस, तू तुझे आयुष्य अशा आदर्श पद्धतीने जगली आहेस. तुला ऑनस्क्रीन किस करताना पाहून आम्हाला खूप अस्वस्थ व्हायला झालं. मग तू असे का केलेस?’
तिच्या मुलाखतीत शेवटी ऐश्वर्या म्हणाली की, ‘लोकांचं मत ऐकून मला धक्का बसला होता. मी फक्त एक अभिनेत्री आहे, मी माझे काम करत आहे आणि इथे मला दोन-तीन तासांच्या चित्रपटातील काही सेकंदांच्या सीनसाठी स्पष्टीकरण देण्यास सांगितले जात आहे.’
ऐश्वर्याने लग्नाच्या सहा महिने आधी हा सीन चित्रित केला होता आणि या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चनही होता. 'धूम २' हा चित्रपट २६ नोव्हेंबर २००६ रोजी रिलीज झाला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न २० एप्रिल २००७ रोजी झाले होते.