बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनय कौशल्यावर आपली स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण याच कलाकारांचे बहिण-भाऊ यामध्ये अपयशी ठरले आहेत. त्यांचे फिल्म इंडस्ट्रीमधील करिअर फ्लॉप ठरले आहे.
अभिनेत्री काजोलने ९०चा काळ काजवला होता. तिचा प्रत्येक चित्रपट हिट ठरत होता. पण काजोलची बहिण तनीषा कधीच हिट ठरली नाही. ती केवळ रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आली.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे आजही लाखो चाहते आहेत. तिच्या अदांवर चाहते घायाळ आहेत. पण तिची बहिण शमिताचे करिअर इंडस्ट्रीमध्ये फ्लॉप ठरले.
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खान ओळखला जातो. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो. पण त्याचा भाऊ फैजल नाव कमावू शकला नाही. त्याने मौसम, क़यामत से कयामत तक, मदहोश आणि मेला चित्रपटात काम केले.
अभिनेत्री यामी गौतम बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक मानली जाते. तिचे अनेक चित्रपट हिट ठरले. पण यामीची बहिण सुरीली इंडस्ट्रीत करिअर करु शकली नाही.