पावसाळा सुरू होताच सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते. शनी देवासाठीही हा महिना महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्रात मराठी महिना आषाढ आजपासून सुरू झाला आहे तसेच याच महिन्यात महाराष्ट्रातील महत्वाची पंढरपूर यात्राही आहे आणि पावसाळाही सुरू आहे. अशात शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात काय काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या.
या काळात शनी महाराजांच्या पूजेला महत्त्व आहे. पावसाळ्यात तुम्ही लहान-सहान पद्धतीने शनिदेवाला प्रसन्न करू शकता. यामध्ये शनिदेवाच्या साडेसाती आणि ढैयाचा प्रभावही कमी होतो. शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी पावसाळ्यात हे दान केले जाऊ शकते.
काळ्या रंगाचे दान :
शनी देवाचा संबंध काळ्या रंगाशी आहे. त्याला हा रंग आवडतो. अशावेळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गरिबांना काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करू शकता. विशेषत: काळे कपडे.
छत्री दान :
पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. विशेषत: कामगार आणि गरीब वर्गाच्या लोकांना अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे कठीण होऊन जाते. त्यामुळे या काळात तुम्ही काळ्या छत्रीचे दान करू शकता. यामुळे शनी महाराजही समाधानी होतील.
शूज आणि चप्पल दान करा :
शनिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पावसाळ्यात गरिबांना काळे बूट आणि चप्पल दान करा. या काळात त्यांना बूट दान करणे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे शनिदेवाचा आशीर्वादही लाभतो.
कुत्र्याला खाऊ घाला :
पावसाळ्यात कुत्र्यांना खाण्यापिण्याचा त्रास होतो. अशा वेळी त्यांना मदत करून खायला द्यायला हवं. असे मानले जाते की श्वानांच्या सेवेने शनिदेव खूप प्रसन्न होतात. विशेषतः काळे कुत्रे.
पक्ष्यांच्या खाऊ घालणे :
पावसाळ्यात पक्ष्यांनाही दाणा-पाणी खाण्याची सोय करण्यासाठी त्रास होतो. अशा वेळी पक्ष्यांना सप्तधान्य खायला द्यावा. त्यामुळे साडेसाती आणि ढैयाचा प्रभाव कमी होतो.