Ashtami Navami Upay: नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या दिवशी 'हे' सोप्पे उपाय करा; उजळेल तुमचं नशीब
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ashtami Navami Upay: नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या दिवशी 'हे' सोप्पे उपाय करा; उजळेल तुमचं नशीब

Ashtami Navami Upay: नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या दिवशी 'हे' सोप्पे उपाय करा; उजळेल तुमचं नशीब

Ashtami Navami Upay: नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या दिवशी 'हे' सोप्पे उपाय करा; उजळेल तुमचं नशीब

Published Oct 20, 2023 04:47 PM IST
  • twitter
  • twitter
Things to do on Ashtami- नवरात्रीत अष्टमी आणि नवमीच्या दिवशी काही सोप्पे उपाय केल्याने नशीब उजळू शकतं, अशी मान्यता आहे. 
नवरात्र अर्थात आदिशक्ती दुर्गा देवील समर्पित उत्सव शारदीय नवरात्र आता काही दिवसांतच संपणार आहे. नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबर रोजी झाली होती. आणि २३ ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी सर्वत्र विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जाणार आहे.
twitterfacebook
share
(1 / 10)

नवरात्र उत्सवादरम्यान अष्टमी-नवमी तिथीला फार महत्व असते. या दोन तिथींला काही ठराविक उपाय केल्यास माता अंबेच्या कृपेने जीवनातील दु:ख आणि वेदना दूर होण्यास मदत होते, असं म्हटलं जातं. या तिथीबाबत आणि कोणते उपाय करायला हवे, याबाबत आपण येथे माहिती करून घेणार आहोत.
twitterfacebook
share
(2 / 10)

यंदा नवरात्रीत अष्टमी तिथी २२ ऑक्टोबर २०२३ म्हणजे येत्या रविवारी आहे. तर सोमवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी महानवमी साजरी केली जाणार आहे.
twitterfacebook
share
(3 / 10)

नवरात्रीदरम्यान अष्टमी-नवमी तिथीच्या दिवशी कन्या पूजन केल्यास लाभ प्राप्त होते, अशी मान्यता आहे. या पूजेमुळे मां दुर्गा प्रसन्न होऊन भक्तांना सुख समृद्धीचे आशीर्वाद ती प्रदान करते असं म्हटलं जातं.
twitterfacebook
share
(4 / 10)

अष्टमी आणि नवमीच्या दिवशी आपल्या कुवतीनुसार गोरगरिबांना दान द्यायला हवे. या दोन्ही तिथींच्या दिवशी तुम्ही गोरगरिबांना अन्नधान्य, कपडे तसेच आर्थिक दान देऊ शकता. दानधर्म केल्याने माता अंबा प्रसन्न होऊन भक्तांची मनोकामना पूर्ण करते.
twitterfacebook
share
(5 / 10)

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला सौभाग्याचे अलंकार म्हणजे कुंकू, बांगड्या, जोडवी, काजळ, नथ आणि इतर वस्तू दान देणे शुभ आणि फलदायी मानले जाते. 
twitterfacebook
share
(6 / 10)

नवरात्रात अष्टमी आणि नवमी तिथीला मां दुर्गेला जलाभिषेक केल्याने धनलाभ होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी अत्तर मिश्रीत सुगंधी पाण्याने मां दुर्गेचा जलाभिषेक करायला हवे.
twitterfacebook
share
(7 / 10)

नवरात्रीत अष्टमी-नवमी तिथीला विधीनुसार महिषासुर मर्दिनी अथवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला हवा. असा पाठ केल्याने मां दुर्गा भक्तांवर प्रसन्न होऊन कृपा करते अशी मान्यता आहे.
twitterfacebook
share
(8 / 10)

अष्टमी आणि नवमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या तुपाचा दिवा लावावा. असं केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होऊन घरातलं दुर्भाग्य दूर होतं, अशी मान्यता आहे.
twitterfacebook
share
(9 / 10)

या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज