अनेकांना सकाळी उठणे कठीण जाते. सकाळी उठायचा कंटाळा येतो. त्यामुळे बहुतांश कामे उशिराने सुरू करावी लागतात. अशावेळी सकाळी उठण्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत.
रात्री झोपण्याच्या अर्धा तास पूर्वी पंधरा मिनिटे व्यायाम करा. यामुळे सहज झोप येते. झोप गाढ असेल तर सकाळी उठण्यात अडचण येत नाही. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी जास्तीत जास्त व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. वाटल्यास थोडं चालायला जा.
(Freepik)दररोज एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करा. रात्री वेगवेगळ्या वेळी झोपू नका. झोपण्याची विशिष्ट वेळ निवडा. यामुळे लवकर झोप येईल आणि सकाळी उठणे अवघड होणार नाही.
(Freepik)दररोज ७ ते ८ तास झोपले पाहिजे. म्हणून सकाळी उठण्यासाठी आपल्याला किती वाजता झोपावे लागेल याचा हिशोब करा. त्यावेळी झोपायला गेलात तर सकाळी उठता येतं.
(Freepik)