
काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव जेद्दाह येथे पार पडला. ज्यामध्ये काही युवा खेळाडूंवरही चांगली बोली लावण्यात आली. अशा स्थितीत आपण येथे तीन युवा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना आगामी हंगामात खेळण्याची संधी मिळाल्यास दमदार कामगिरी करू शकतात.
वैभव सूर्यवंशी- १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. वैभवने अलीकडेच ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या युवा कसोटीत अप्रतिम शतक झळकावले होते. राजस्थान रॉयल्सच्या ट्रायलसाठी तो नागपूरलाही गेला होता. तिथेही त्याने खळबळ उडवून दिली होती.
अल्लाह गझनफर- अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज अल्लाह गझनफर याला मुंबई इंडियन्सने ४.२० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती. गझनफरने अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत ८ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर १२ विकेट आहेत. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.
मुशीर खान- सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान याला पंजाब किंग्जने यावेळी ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. मुशीर सातत्याने फलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे. या वर्षी झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात त्याने २ शतके झळकावली. यानंतर तो आपल्या भावाप्रमाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. आता मुशीरला आयपीएलमध्येही आपली छाप सोडायला आवडेल.


