बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत अ आणि भारत ब यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत ब संघाच्या मधल्या फळीतील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुशीरचा भाऊ सरफराज खान ९ धावा करून बाद झाला तर ऋषभ पंत ७ धावा करून बाद झाला. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे खातेही उघडले नाही.
मुशीरची फर्स्ट क्लास कारकीर्द फक्त ७ सामन्यांची आहे, पण त्याने आपण लंबी रेस का घोडा असल्याचे दाखवून दिले आहे. मुशीर खानने कठीण पीचवर शतकाचा टप्पा पार केला. यानंतर मुशीर खानकडे टीम इंडियाचा मोठा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. असे मानले जाते की मुशीर खान लवकरच त्याचा मोठा भाऊ सरफराज खानप्रमाणे टीम इंडियाच्या जर्सीत दिसू शकतो.
(PTI)पण त्याआधी मुशीर खान आयपीएलमध्ये दिसू शकतो. अशा स्थितीत आयपीएलच्या मेगा लिलावात मुशीर खानवर किती मोठी बोली लागणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान कोणते संघ मुशीर खानवर बोली लावू शकतात, हे आपण जाणून घेऊ.
मुंबई इंडियन्स- आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला मुंबई इंडियन्स मुशीर खानवर बोली लावू शकतो. मुशीर खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुशीर खान देशांतर्गत क्रिकेटमधील एक उगवता स्टार आहे. आयपीएल लिलावात मुशीर खानवर पैशांचा पाऊस पडू शकतो, असे मानले जात आहे. मुंबई इंडियन्स मुशीर खानवर करोडो रुपयांची बोली लावू शकते.
(PTI)चेन्नई सुपर किंग्ज - चेन्नई सुपर किंग्जदेखील मुशीर खानवर बोली लावू शकते. अशा स्थितीत मुशीर खान चेन्नई सुपर किंग्जचा भाग होऊ शकतो. जर चेन्नई सुपर किंग्सने मुशीर खानला घेतले तर तो मधल्या फळीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचवेळी मुशीर खान चेन्नई सुपर किंग्जचा भाग झाला तर त्याला धोनी आणि फ्लेमिंगकडून शिकण्याची चांगली संधी मिळेल.
(PTI)पंजाब किंग्स- पंजाब किंग्जला मधल्या फळीत एका चांगल्या फलंदाजाच्या शोधात आहे. पंजाब किंग्जला नेहमीच मधल्या फळीत चांगल्या फलंदाजासाठी झगडावे लागले. मात्र, आयपीएल लिलावात मुशीर खान पंजाब किंग्जसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. आयपीएल लिलावात पंजाब किंग्ज मुशीर खानवर बऱ्यापैकी पैसे खर्च करू शकतात.
मुशीर गोलंदाजीही करतो- एक काळ असा होता की भारतीय संघातील प्रत्येक फलंदाज गोलंदाजी करत असे. सचिन, सेहवाग, गांगुली, युवराज यापैकी कोणीही १० षटके टाकू शकत होते. पण आता भारतीय संघात अशा खेळाडूंची उणीव आहे. अशा स्थितीत मुशीर खान फलंदाजीसोबतच एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज देखील आहे. अंडर-१९ वर्ल्डकपमध्येही त्याने ७ विकेट घेतल्या होत्या.