आपण येथे भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांचा बिझनेस काय आहे आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे हे देखील आपण येथे जाणून घेणार आहोत.
युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा - युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा व्यवसायाने कोरिओग्राफर आहे. डेंटिस्ट्रीचे शिक्षण घेतल्यानंतर धनश्री वर्माने डान्सची आवड जोपासली आहे. धनश्री वर्मा लवकरच तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनश्री वर्माची एकूण संपत्ती २५ कोटी रुपये आहे. ती खूप विलासी जीवन जगते.
झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे- झहीर खानची पत्नी सागरिका राजघराण्यातील आहे. अभिनेत्रीची आजी म्हणजेच सीता राजे घाटगे या इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर तिसरे यांच्या कन्या आहेत.
सागरिकाने 'चक दे इंडिया' चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्क्रीन अवॉर्डही मिळाला होता. सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार, सागरिका घाटगेची एकूण संपत्ती (२७ कोटी) आहे.
एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सिंह खूप आलिशान जीवन जगते. साक्षी सिंग महेंद्रसिंग धोनीच्या चित्रपट निर्मिती कंपनीची व्यवस्थापकीय संचालक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साक्षी सिंहची एका रिअल इस्टेट फर्ममध्ये २५ टक्के हिस्सेदारी आहे.