मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ram Mandir : सचिन ते धोनी… टीम इंडियाचे हे क्रिकेटपटू अयोध्येला जाणार, पाहा

Ram Mandir : सचिन ते धोनी… टीम इंडियाचे हे क्रिकेटपटू अयोध्येला जाणार, पाहा

Jan 17, 2024 06:50 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

Ram Mandir Cricketers Invitation List : अयोध्येत २२ जानेवारीला भगवान श्री रामांची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याबाबत देशभरात प्रचंड उत्साह आहे. या कार्यक्रमाला देशातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थिती लावणार आहेत. क्रिकेट जगतातील अनेक बड्या व्यक्तींनाही या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे.

श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठापणला सोहळ्याला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली, भारताला तीन आयसीसी ट्रॉफी मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनी आणि भारताचा महान फिरकीपटू हरभजन सिंग यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आतापर्यंत जवळपास ६ हजार विशेष व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. यात क्रिकेटपटूंशिवाय चित्रपट क्षेत्रातील खास व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपतींचा समावेश आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंगळवारपासून (१६ जानेवारी) सुरुवात झाली आहे. या दिमाखदार सोहळ्यासाठी संपूर्ण आयोध्या शहर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

श्री रामांची प्राणप्रतिष्ठापणा २२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० ते १ या वेळेत होणार आहे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या सोहळ्यात १५० देशांतील रामभक्त सहभागी होण्याची शक्यता आहे. २१ जानेवारी आणि २२ जानेवारीला मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर हे मंदिर २३ जानेवारीला रामलल्लाच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

या सोहळ्यात १५० देशांतील रामभक्त सहभागी होण्याची शक्यता आहे. २१ जानेवारी आणि २२ जानेवारीला मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर हे मंदिर २३ जानेवारीला रामलल्लाच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.

WhatsApp channel

इतर गॅलरीज