वातावरणात थोडासा जरी बदल झाला की डासांची पैदास सुरू होते. विशेषत: घराजवळ झाडे किंवा गटार असेल तर काही याचा त्रास आणखी वाढतो. रात्रंदिवस डासांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण बाजारातून विविध उत्पादने खरेदी करतात. पण तुम्ही काहीही पैसे खर्च न करता सुद्धा काही घरगुती उपायांनी ही समस्या सोडवू शकता.
(Freepik)डास म्हणजे मलेरिया, चिकनगुनिया किंवा डेंग्यूची भीती. या आजारांच्या साथीपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी डासांपासून दूर राहणे सुद्धा महत्त्वाचे आहे. परिणामी घरातील काही सोप्या मार्गांनी डासांना दूर करता येते.
लिंबू - जर तुमच्या घरी लिंबू असतील तर त्यात लवंग बारीक करून घराच्या खिडकीच्या ग्रीलवर ठेवा. यासाठी तुम्ही थोडे खराब झालेले जुने लिंबू वापरू शकता. त्यामुळे घरात डासांचा प्रवेश कमी होईल. शिवाय प्लेटमध्ये लिंबाचा तुकडा घेऊन रूमच्या कोपऱ्यात ठेवले तरी डास येणार नाही.
कडुलिंब: डासांपासून दूर राहण्याचा हा हर्बल मार्ग आहे. कडुलिंबाचे तेल आणि नारळाचे तेल मिक्स करून ते त्वचेवर लावल्यास डासांचा त्रास होत नाही. याने डास जवळ येणार नाहीत.
पुदिना: थोडासा पुदिनी एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. हे पान असेच राहू द्या आणि दर काही दिवसांनी त्याचे पाणी बदला. पुदिन्याजवळ डास येत नाहीत. गरम पाण्यात पुदिना उकळून ते घरभर स्प्रे करू शकता किंवा त्याची वाफ घरभर फिरवू शकता. त्यामुळे डास कमी होतात.
चहापत्ती - चहा बनवून झाल्यानंतर उरलेली चहापत्ती सुकवून घ्या. मग तुम्ही ते थोडेसे जाळून त्याचा धूर घरभर फिरवू शकता. हे डासांना सहज दूर करू शकते.
लसूण - एक भाग लसणाचा रस पाच भाग पाण्यात मिक्स करा. नंतर ते पाणी उकळून थंड करा. हे पाणी घरभर स्प्रे करा. तसेच कुस्करलेला लसूण घराच्या कोपऱ्यात ठेवल्यास डास आणि पाल दूर होण्यास मदत होते.
(Freepik)