बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे पाहिल्यानंतर प्रेक्षकांचं डोकं अक्षरशः फिरलं आहे. या चित्रपटांच्या कथाही लोकांच्या डोक्यावरून गेल्या आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कधी आले आणि कधी निघून गेले हे कळले देखील नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच ८ चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे पाहिल्यानंतर तुमच्या डोक्याचीही अक्षरशः वाट लागेल. चला जाणून घेऊया…
राम गोपाल वर्मा यांच्या 'आग' या चित्रपटात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट १९७५च्या कल्ट क्लासिक 'शोले' वरून प्रेरित होता. परंतु, हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप ठरला. या चित्रपटाला आयएमडीबीवर १.४ रेटिंग मिळाले आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हरमन बावेजा यांचा 'लव्ह स्टोरी २०५०' हा चित्रपटही सुपर फ्लॉप झाला होता. त्याला आयएमडीबीवर २.५ रेटिंग देण्यात आली होती.
साजिद खान दिग्दर्शित 'हमशकल' या चित्रपटात सैफ अली खान आणि रितेश देशमुखसारखे कलाकार दिसले होते. या चित्रपटाला आयएमडीबीवर १.७ रेटिंग मिळाली आहे.
अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तीस मार खान’ हा एक मेगाफ्लॉप चित्रपट होता. त्याला आयएमडीबीवर २.७ रेटिंग मिळाले.
१९८४ साली प्रदर्शित झालेला जितेंद्रचा ‘हिम्मतवाला’ हा सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अजय देवगण आणि तमन्ना भाटिया दिसले होते. या चित्रपटाला आयएमडीबीवर १.७ रेटिंग मिळाले आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, सनी देओल, सोनू निगम असे अनेक मोठे स्टार्स दिसले होते. इच्छाधारी नाग-नागिनवर हा चित्रपट बनवला होता. मल्टीस्टारर चित्रपट असूनही, 'जानी दुश्मन-एक अनोखी कहानी'ला देखील आयएमडीबीवर २.७ रेटिंग मिळाले आहे.