क्रिकेट जगतात असे अनेक खेळाडू आहेत. ज्यांनी आपला धर्म बदलला आहे. या यादीत ३ भारतीय आणि एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचा समावेश आहे.
रॉबिन उथप्पा : भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा याचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्यानंतर वयाच्या २५व्या वर्षी त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला.
युसूफ योहाना : पाकिस्तानातील ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या युसूफ योहानाने इस्लाम धर्म स्वीकारला. त्याला संघाचा कर्णधार व्हायचे होते आणि या मार्गात धर्म येत असल्याचे सांगितले जाते. पण असे असूनही त्याला कधीही अधिकृतपणे कर्णधार घोषित करण्यात आले नाही. धर्मांतरानंतर त्याचे नाव मोहम्मद युसूफ असे झाले.
सूरज रणदीव : दिलशानप्रमाणेच श्रीलंकेचा क्रिकेटर सूरज रणदीवचाही जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. मात्र, नंतर त्याने मोहम्मद मसरुक सुरज या नावातून सुरज पणदीव होण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या माजी ऑफस्पिनरने बौद्ध धर्म स्वीकारला.
विनोद कांबळी : सचिन तेंडुलकर याचा मित्र आणि माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी याचाही धर्म बदलणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश आहे. कांबळी हिंदू धर्मातून ख्रिश्चन झाला.
वायने पारनेल : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वायने पारनेलने इस्लाम धर्म स्वीकारला. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ६ कसोटी, ७३एकदिवसीय आणि ५६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पुणे वॉरियर्सचाही भाग होता.
तिलकरत्ने दिलशान: श्रीलंकेचा महान अष्टपैलू खेळाडू तिलकरत्ने दिलशानचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. जेव्हा त्याचे पालक वेगळे झाले तेव्हा त्याने इस्लाम सोडण्याचा आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याचं नाव तैवान मोहम्मद दिलशान होतं.
कृपाल सिंग: माजी भारतीय क्रिकेटपटू एजी कृपाल सिंग यांचा जन्म शीख कुटुंबात झाला होता, पण नंतर त्यांनी धर्म बदलला. वास्तविक, ते इस्मी कृपाल (Esmie Kripal Singh) सिंगच्या प्रेमात पडले, जिच्याशी त्यांनी लग्न करण्यासाठी ख्रिश्चन होण्याचा निर्णय घेतला.