सिनेजगतात असे अनेकदा दिसून आले आहे की जेव्हा कधी नायक पडद्यावर येतो तेव्हा लोक त्याला पाहून खूप शिट्ट्या मारतात आणि खलनायकाला मार लागल्यावर आनंद होतो. पण कालांतराने या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलल्या. नायकाच्या भूमिकेशिवाय, अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सनी ग्रे शेडच्या पात्रांमध्येही आपले कौशल्य सिद्ध केले आणि भरपूर टाळ्या मिळवल्या. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही बॉलिवूड स्टार्स आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकांविषयी…
शाहरुख खानला फिल्म इंडस्ट्रीत रोमान्सचा बादशाह म्हटले जाते. पण डर या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून त्याने सर्वांना घाबरवले. या चित्रपटात सनी देओल हिरोच्या भूमिकेत होता आणि त्याच्यासोबत अभिनेत्री जुही चावला दिसली होती.
खाकी या चित्रपटात अजय पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटात त्याने ज्याप्रकारे पोलिसांना चकमा दिला ते पाहून प्रेक्षकांनी अजयची वाह वाह केली.
रणवीर सिंगच्या पद्मावत चित्रपटातील अलाउद्दीन खिलजीची भूमिका कोणी कशी विसरेल? या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
चॉकलेट बॉय म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या बॉबी देओलने आश्रम या वेब सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका साकारली आहे. या भूमिकेने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली.
संजय दत्तने अग्निपथ या चित्रपटात कांचा चीना नावाच्या खलनायकाची भूमिका केली होती या चित्रपटातील त्याचा गेटअप पाहून तो स्वत: घाबरला होता. याशिवाय संजयने इतरही अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत काम केले आहे.